धनेगाव येथे 25 वर्षांनी एकवटले बालमित्र
केज/प्रतिनिधी
बालपणीच्या आठवणीत मैत्रीभाव जोपासण्यासाठी तब्बल 25 वर्षांनी सर्व मित्रांनी एकत्र येत गेट-टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला बालमित्रानी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
केज तालुक्यातील धनेगाव येथे 1999- 2000 सातवी बॅचच्या मित्रांनी एकत्र येऊन बालपणीच्या आठवणीना उजाळा देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या इयत्ता सातवीच्या बाल मित्रांनी मेळावा घेत पुन्हा एकदा बालपणीचा आठवणी ताज्या केल्या.शाळेची घंटा वाजवून राष्ट्रगीत,प्रार्थना,परिपाठ घेऊन विद्यार्थ्यानी पुन्हा एकदा बालपणीची शाळा अनुभवली.25 वर्षापूर्वी ज्ञानदान केलेल्या शिक्षकांवर पुष्पवृष्टी करत त्यांचा सन्मान करत ऋण व्यक्त केले.कार्यक्रमानंतर स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी सण 1999 – 2000 साली कार्यरत असलेले शिक्षक श्री.सोमवंशी, श्री.आरेकर, श्री.हांडीबाग, श्री.निपानिकर, श्री. शिखारे त्याचबरोबर भोसले दत्तात्रय वैजनाथ, नवनाथ जगताप,शिवप्रसाद स्वामी.सुरेखा मुळे, शुभांगी गुजर, स्वाती गुजर, सुनिता गुजर यांच्यासह इतर विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.

