बुलंद आवाज – ‘लखन भैय्या हजारे’ तरुणांच्या गळ्यातील ताईत
निष्ठा, संघर्ष आणि नेतृत्व!
केज/सचिन भालेराव
राजकारणात वारसा मिळणे ही भाग्याची गोष्ट असली, तरी तो वारसा कार्यातून आणि निष्ठेतून सार्थ ठरवणे हे खऱ्या नेतृत्वाचे लक्षण मानले जाते. केजच्या प्रथम नगराध्यक्षा तथा माजी सरपंच छायाताई हजारे यांच्या संस्कारातून घडलेले आणि बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूरावजी पोटभरे तसेच जनविकास आघाडीचे सर्वेसर्वा हारुण भाई इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले धडाडीचे नेतृत्व म्हणजे लखन भैय्या हजारे.
सच्चा कार्यकर्ता म्हणून ओळख
बहुजन विकास मोर्चाचे केज तालुकाध्यक्ष म्हणून लखन भैय्या हजारे यांची ओळख केवळ पदापुरती मर्यादित नाही. ज्येष्ठ नेत्यांच्या विचारांशी बांधील राहून सामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची त्यांची भूमिका ठळकपणे दिसून येते. शहर आणि तालुक्यातील विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
‘ब्लू स्टार ग्रुप’मधून तरुणांची संघटना
भीनगर (केज) येथे ‘ब्लू स्टार ग्रुप’ची स्थापना करून लखन भैय्यांनी तरुणांची मजबूत संघटना उभी केली आहे. तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी जयंती सोहळा भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडून संघटन कौशल्य दाखवून दिले.
‘APL’ आणि अन्यायाविरुद्ध भूमिका
क्रीडाप्रेमी तरुणांसाठी ‘आंबेडकर प्रीमियर लीग’ (APL) चे आयोजन करून त्यांनी युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. याचबरोबर समाजातील शोषित आणि पीडित घटकांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ‘दलित अन्याय अत्याचार समिती’ची स्थापना केली. तालुक्यात कुठेही अन्यायाची घटना घडल्यास प्रशासनाशी संवाद साधत ठाम भूमिका घेण्याची त्यांची कार्यपद्धती आहे.
लोकसेवेचा वारसा
आई छायाताई हजारे यांनी नगराध्यक्षा म्हणून केलेल्या विकासकामांचा वारसा पुढे नेत लखन भैय्या हजारे संघटन बळकट करण्यावर भर देत आहेत. बहुजन विकास मोर्चाचे तालुकाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर त्यांनी संघटनेचे जाळे गावागावात विस्तारले आहे. शेतकरी, बेरोजगार तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर ते आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसतात.
“पोटभरे साहेब आणि हारुण भाई इनामदार यांचे मार्गदर्शन हीच माझी ताकद आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे,” असा विश्वास लखन भैय्या हजारे यांनी व्यक्त केला.

