माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन’च्या केज तालुका अध्यक्ष पदी प्रदिप गायकवाड यांची नियुक्ती
केज:प्रतिनिधी
केज येथील फुले नगर भागातील रहिवाशी पत्रकार प्रदिप काशिनाथ गायकवाड यांची माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन – केज तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती ०३ डिसेंबर २०२५ पासून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी दिली.
या नियुक्तीस जिल्हा अध्यक्ष अजय भांगे यांनीही शुभेच्छा व पूर्ण सहकार्य व्यक्त केले.
नियुक्ती पत्रानुसार, हे पद मानद स्वरूपाचे असून गायकवाड यांनी भारतीय संविधान, भारतीय कायदे आणि फेडरेशनच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. तसेच माहिती अधिकार अधिनियम २००५ चा उपयोग व्यापक जनहितासाठी करावा, नागरिकांमध्ये माहिती अधिकाराबाबत जनजागृती करावी आणि समाजात पारदर्शकता वाढविण्यासाठी कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
प्रदिप गायकवाड यांच्या नियुक्तीमुळे केज तालुक्यात माहिती अधिकार मोहिमेला नवी गती मिळेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष अजय भांगे यांनी व्यक्त केला आहे. फेडरेशन तर्फे प्रदिप गायकवाड यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.

