ताज्या घडामोडी

पत्रकार चंद्रकांत पाटील यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर उत्कृष्ट तालुका प्रतिनिधी पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवसेना पदाधिकारी यांनी केला सत्कार


केज/प्रतिनिधी

समर्थ राजयोगच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार चंद्रकांत पाटील यांचा आचार्य बाळशास्त्री जांभेकर उत्कृष्ट तालुका प्रतिनिधी म्हणून निवड झाली.या यशाबद्दल शिवसेना कार्यालयात दि.6 सप्टेंबर रोजी शनिवारी आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला

सत्कार समारंभाला शिवसेना तालुकाप्रमुख पृथ्वीराज सुरेशराव पाटील,शिवसेना विधानसभा प्रमुख दादासाहेब शंकरराव ससाणे,युवासेना तालुकाप्रमुख दत्तकुमार काकडे,युवासेना उप तालुकाप्रमुख शिवाजी गायकवाड,विठ्ठल झाडे, विनोद महाजन,ज्ञानेश्वर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी मान्यवरांनी चंद्रकांत पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की,ग्रामीण भागातील समस्या व जनतेचे प्रश्न समाजापुढे मांडण्याचे उल्लेखनीय कार्य तेसातत्याने करीत आहेत.त्यांच्या या पत्रकारितेच्या योगदाना मुळेच त्यांना हा बहुमान मिळाला आहे.पत्रकार चंद्रकांत पाटील यांनीही यावेळी सर्व मान्यवरांचे आभार मानले.हा पुरस्कार माझ्या पत्रकारितेच्या कार्याची दखल घेत मिळालेला सन्मान असून यामुळे आणखी जबाबदारी वाढली आहे.समाज हितासाठी निष्पक्षपणे लेखणी चालवत राहीन असे त्यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *