आगामी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करावेत-प्रवीण खोडसे
केज/सचिन भालेराव
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या सूचनेवरून व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ,राज्यसभा खासदार रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आदित्य पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असून महाविकास आघाडीतील काही घटक पक्षाच्या इच्छुक उमेदवाराकडून अमुक जागा,अमुक पक्षाची असल्याचे दर्शवून जनतेची दिशाभूल केली जात आहे. अद्याप महाविकास आघाडीची कसल्याही प्रकारची चर्चा झालेली नसून आघाडीचा कुठलाही प्रस्ताव मिळालेला नाही. त्यामुळे कुठलीही जागा,कुठल्याही पक्षाला आघाडीत सुटलेली नसून काँग्रेस पक्षाकडे सर्व जागेवर लढण्यासाठी अतिशय चांगले उमेदवार इच्छुक आहेत.त्यामुळे काँग्रेस पक्ष सर्व जागा स्वबळावर लढणारा असून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज करावेत असे आवाहन तालुकाध्यक्ष प्रवीण खोडसे यांनी केले आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाकरिता काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छित असलेल्या सर्व इच्छुक उमेदवारांनी अर्ज जमा करावेत असे आवाहन केज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रवीण खोडसे पाटील यांनी केले आहे.

