महाराष्ट्रसामाजिक

“फलोत्पादन विभागाची जागा नगरपंचायतीकडे – व्यापारी संकुल, क्रीडा संकुल व विकासकामांसाठी नवे दालन खुले”


केज वासियांसाठी आनंदाचा क्षण – गटनेते हारुणभाई इनामदार

केजच्या विकासात नवा अध्याय!

केजकरांच्या स्वप्नांना नवी उभारी! 

“केज शहराच्या सर्वांगीण विकासात भर टाकणारा ऐतिहासिक निर्णय”

केज/सचिन भालेराव

केज शहरातील नागरिकांची व व्यापाऱ्यांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. फलोत्पादन (जिरायत खाते) विभागाची मोक्याची जागा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या शिफारशीनुसार केज नगरपंचायतला हस्तांतरित करण्यात आली आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे गटनेते हारुणभाई इनामदार यांनी आज केज येथील विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगराध्यक्ष सौ. सिताताई बनसोड, नगरसेविका पदमीनबाई शिंदे, राजू इनामदार, जलालभाई इनामदार आदींसह नगरसेवक, पत्रकार बांधव उपस्थित होते.

गटनेते इनामदार म्हणाले की,

“या निर्णयामुळे व्यापारी संकुल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. व्यापाऱ्यांना नगरपंचायतीकडून परवडणाऱ्या दरात गाळे व दुकाने उपलब्ध होतील. नागरिकांच्या अनेक वर्षांच्या स्वप्नपूर्तीचा हा क्षण आहे.”

ते पुढे म्हणाले की,

“या जागा हस्तांतरणासाठी स्वर्गीय विमलताई मुंदडा, खा. सौ. रजनीताई पाटील, खा. बजरंग बप्पा सोनवणे, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा (काकाजी), जेष्ठ नेते रमेशराव आडसकर, अंकुश अण्णा इंगळे, सर्वपक्षीय नगरसेवक, पत्रकार बांधव व केजकरांचे मोलाचे योगदान राहिले आहे. लवकरच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जागा रिक्वायर करून अतिक्रमणे हटवून भव्य व्यापारी संकुल उभारले जाईल.”

या निर्णयामुळे केज नगरपंचायतला व्यापारी संकुलाबरोबरच (सुमारे 100 x 1000 स्क्वेअर फुट) क्षेत्रफळ क्रीडा संकुल व अन्य विकासकामांसाठी उपलब्ध झाले आहे. यामुळे केज शहराच्या विकासाला नवे बळ मिळेल, असा विश्वास गटनेते हारुणभाई इनामदार यांनी व्यक्त केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *