भिम आर्मी शहराध्यक्षपदी संदिप कांबळे यांची निवड
प्रतिनिधी/दिलीप कांबळे
लातूर, दि. 15 सप्टेंबर 2025 :डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर येथे झालेल्या कार्यक्रमात संदिप कांबळे यांची भिम आर्मी शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा मराठवाडा निरीक्षक अक्षय धावारे यांच्या हस्ते जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या वेळी अक्षय धावारे यांनी सांगितले की, समाजातील अनेक ज्वलंत प्रश्नांवर काम करण्यासाठी संदिप कांबळे यांची “घरवापसी” झाली असून, समाजावरील वाढते अन्याय-अत्याचार थांबविण्यासाठी लातूर शहरात संघटना बांधणी मजबूत करण्यात येईल.

नवनिर्वाचित शहराध्यक्ष संदिप कांबळे यांनीही संघटना बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्हाभरात संघटना उभारणीचे आवाहन जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे यांनी केले.
या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष विशाल पोटभरे, जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे, जिल्हा सचिव बबलू शिंदे, जिल्हा संघटक सोनू घोडके, अजय टेंकाळे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

