राजकीयसामाजिक

गायरान मुक्तीसाठी आमरण उपोषणाचा विजय : दलित नेते नगरसेवक कपिल मस्केंचा सामाजिक कार्याचा झंझावाद


केज/सचिन भालेराव

केज शहर व तालुक्यातील वंचित घटकांचे प्रश्न घेऊन सतत लढा देणारे दलित नेते नगरसेवक कपिल मस्के हे आज सामान्य जनतेच्या आशेचा किरण ठरले आहेत.

वयाच्या १५व्या वर्षी फुले, शाहू, आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा ध्यास घेत सामाजिक चळवळीत उतरलेले मस्के यांनी फुलेनगरमधील ग्रामपंचायत सदस्य म्हणून प्रवास सुरू करून पुढे नगरपंचायतीत नगरसेवक पद गाठले. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता अशा मूलभूत कामांसोबतच वंचित घटकांना सुविधा मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

रमाईनगर दलित वस्तीतील गायरान जमिनीवरील २० वर्षांपासूनचे अधिक्रमण धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी तहसीलसमोर आमरण उपोषण छेडले आणि गायरान मुक्तीचा लढा यशस्वी केला. याच ठिकाणी तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून विपश्यना केंद्र व अभ्यासिकेसाठी ते प्रयत्नशील आहेत.

आज त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली असून, कपिल मस्के हे केज तालुक्यातील वंचित घटकांचे बुलंद नेते म्हणून नावारूपास आले आहेत. आगामी काळात ते आणखी ताकदीने समाजहितासाठी लढतील, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *