दीपक भाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त उपळी येथे पॅंथर सेनेचं भव्य रक्तदान शिबिर संपन्न.
प्रतिनिधी/सचिन भालेराव
उपळी (ता.वडवनी) – ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक दीपक भाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त वडवणी तालुक्यातील उपळी गावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात अनेक कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श उभा केला.
या कार्यक्रमात जिल्हा सचिव वसीम भाई शेख, महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक घोळवे पाटील, केज ता.अध्यक्ष समाधान बचुटे, वडवणी ता.अध्यक्ष त्रिंबक पाईक, धारूर ता.अध्यक्ष राजेश कोकाटे, मांजलगाव ता.अध्यक्ष सुनील कांबळे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते अमोल जाधव, निलेश वाघमारे, विशाल आरकडे, आकाश शिरसाठ, उमेश मस्के, अक्षय शिरसाठ, कृष्णा शिंदे, मनोज गडसिंग, अशोक भांबड, शेख सुमेर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या
शिबिरामुळे गावातील जनतेमध्ये समाजिक जागरूकतेचा संदेश पोहचवण्यात आला असून, संघर्ष नायक दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाखालील सामाजिक बांधिलकीची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

