“तात्काळ भाकड जनावरांचा सर्वे करा, अन्यथा जनावरे तहसील कार्यालयात बांधू” – चंद्रकांत खरात सर यांचा इशारा.
केज/सचिन भालेराव
जिल्ह्यात भाकड जनावरांची समस्या गंभीर होत चालली असून शेतकऱ्यांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेतातील पिकांचे नुकसान, राखण करण्यासाठी रात्रंदिवस शेतात थांबावे लागणे, यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. मात्र शासनाकडून अद्याप या प्रश्नावर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात सर यांनी केज तहसीलचे तहसीलदार राकेश गिड्डे यांना निवेदन दिला आहे.
“भाकड जनावरांमुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. शासनाने तात्काळ या जनावरांचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी. अन्यथा आम्हाला ही जनावरे तहसील कार्यालयात आणून बांधण्याशिवाय पर्याय उरणार नाही.”
भाकड जनावरांचा तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे, जनावरांसाठी स्वतंत्र गोशाळा, आश्रयस्थाने निर्माण करणे,नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरळ आर्थिक मदत जाहीर करणे.अशा प्रकारच्या खरात सर यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास, शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही मागणी लवकरात लवकर मान्य करून योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

