कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने सत्कार संपन्न
केज/सचिन भालेराव
—————————-
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सांस्कृतिक सभागृहामध्ये सभासद नोंदणी करताना स्थानिक कलावंतांचा विचार करावा प्रा. हनुमंत भोसले
—————————-
३१ जुलै रोजी पुरोगामी पत्रकार संघ संलग्न कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वर्गीय मोहम्मद रफी गीत गायन स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस सुनिता उमाकांत बोधणे यांनी पटकावले आहे त्यामुळे कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह केज या ठिकाणी सुप्रसिद्ध गायिका सुनिता उमाकांत बोधणे यांचा सन्मान चिन्ह सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी केज नगरपंचायत च्या नगराध्यक्ष सौ सीता ताई बनसोड जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा हरुण भाई इनामदार शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड ज्येष्ठ समाजसेवक प्रा.हनुमंत भोसले माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अजमुद्दिन इनामदार पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष रंजीत घाडगे पत्रकार प्रदीप गायकवाड, सचिन भालेराव ,कला क्रीडा विश्व समितीचे अध्यक्ष अनिल वैरागे, मुनीर कुरेशी, बलभीम मस्के, शिवमुर्ती हजारे, कल्याणजी मस्के, उमाकांत बोधणे, कला क्रीडा विश्व समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले नगराध्यक्ष सौ सीता ताई बनसोड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या आम्ही सदैव कलावंतांच्या अडचणी सोडवण्यासाठी व कलावंतांच्या विकासासाठी सदैव पाठीशी उभे आहोत तसेच जनविकास परिवर्तन आघाडीचे हरुण भाई इनामदार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले केज शहराचा सांस्कृतिक वारसा व सांस्कृतिक चळवळ सदैव टिकून राहण्यासाठी आम्ही कलावंतांच्या सोबत सदैव राहू असे बोलताना आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाची प्रस्तावना कला क्रीडा विश्व समितीचे उपाध्यक्ष मुनीर कुरेशी यांनी केले व आभार माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अजमदीन इनामदार यांनी मानले.

