सामाजिक

शेतकऱ्यांनी बीबीएफ टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड केल्यास उत्पादनात भरघोस वाढ – श्रीकन्या जाधव


श्रीपतराववाडी येथे पाटोद्यातील शेतकऱ्यांची अभ्यास सहल

अंबाजोगाई/दिलीप कांबळे
शेतकऱ्यांनी बीबीएफ टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड केल्यास सोयाबीन उत्पादनात भरघोस वाढ होऊन शेतकऱ्याची उन्नती होऊ शकते. एकरी १८ ते२१ किंटल सोयाबीन उतारा निघू शकतो. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी असे वक्तव्य प्रगतशिल शेतकरी श्रीकन्या जाधव यांनी श्रीपतरायवाडी तालुका अंबाजोगाई येथे पाटोदा तालुक्यातील सहलीत आलेल्या महिला पुरुष शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. पाटोदा तालुक्यातील वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या शाश्वत उपजिविका विकास प्रकल्पा अंतर्गत अॅक्सिस बँकेच्या अर्थसहाय्याने पाटोदा तालुक्यातील ११ गावांची अंबाजोगाई तालुक्यातील श्रीपतरायवाडी येथील सौ श्रीकंन्या राजेंद्र जाधव यांच्या बी बी बी एफ व टोकन पेरणी सोयाबीन पिक निरिक्षण व कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई येथे मार्गदर्शनसाठी शेतकरी अभ्यास सहल संपन्न झाली. श्रीकन्या जाधव पुढे बोलताना म्हणाले की शेतीमध्ये महिलांचा मोठा वाटा आहे. महिलांनी शेतीविषयक अभ्यास करणे काळाची गरज आहे. सोयाबीन बीड जिल्ह्यातील मुख्य पीक आहे. परंपरागत पद्धतीने सोयाबीन सह इतर पिकाची शेतकरी पेरणी करतात या पद्धतीमुळे उत्पादन वाढ एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन मिळते आधुनिक पद्धतीने शेती केल्यास उत्पादनात भरघोस वाढ होऊ शकते. आम्ही एकरी २१ क्विंटल सोयाबीन उत्पादन काढतो. ही किमया बीबीएफ आणि टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड केल्यामुळे झाली आहे. बीज प्रक्रिया आणि उगवण क्षमता याचे महत्त्व शेतकऱ्यांना सांगितले. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी असे आवाहन श्रीकन्या जाधव यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *