अक्षय निवास येथे राष्ट्रसंत भगवान बाबा जयंती व राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी साजरी
अंबाजोगाई/दिलीप कांबळे
राष्ट्रसंत, ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवान बाबा यांनी समाजातील ऐक्य, सद्भावना आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या न्यायप्रिय, दयाळू आणि लोककल्याणकारी कार्यासाठी प्रसिद्ध झालेल्या महान शासक होत्या.
आज अक्षय निवास येथे राष्ट्रसंत भगवान बाबा जयंती आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी पनगेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन तथा केज विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते मा. अक्षय भैय्या मुंदडा (भैय्यासाहेब) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

