महाराष्ट्रराजकीय

येवता जिल्हा परिषदेचा गड ; महायुतीच्या प्रगतीताई घुले सर्वांना जड !


अख्खी महाविकास आघाडी एकत्र झाली तरी जिंकनार घुलेच

प्रगतीताई घुले यांना सर्व जाती-धर्मातील मतदारांची मिळणार साथ

केज/सचिन भालेराव

येवता जिल्हा परिषद सर्कल यावर्षी ओबीसी महिला राखीव सुटल्यामुळे या मतदारसंघात प्रचंड राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून सौ.प्रगती सुरज घुले यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

सौ.प्रगती घुले या भाजप युवा नेते सुरज भैय्या घुले यांच्या पत्नी असून,घुले कुटुंबाचा या सर्कलमध्ये मजबूत जनाधार आहे.लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे निष्ठावान सहकारी रामकृष्ण घुले काका यांनी २०१७ पर्यंत याच सर्कलमध्ये कार्य केले असून,त्या काळात त्यांनी भाजपचा झेंडा जिल्हा परिषदेत फडकवण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.घुले कुटुंबाची राजकारणातील स्वच्छ प्रतिमा, गटबाजीपासून दूर राहून विकासाभिमुख कार्यपद्धती हीच त्यांची खासियत राहिली आहे. सुरज भैय्या घुले यांनी देखील वृक्षारोपण मोहिमा,लंपी आजारावरील लसीकरण उपक्रम, जयंती निमित्त सामाजिक कार्यक्रम,तसेच सर्कलमधील गावांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत एक सक्षम युवा नेतृत्व म्हणून ठसा उमटवला आहे.

याच सर्कलमधील घुले काकांनी कार्य केलेल्या २० पैकी तब्बल १९ गावांमध्ये घुले परिवाराचा प्रभाव आजही कायम आहे.त्यामुळे सौ.प्रगती सुरज घुले यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असून,या सर्कलमध्ये भाजपसाठी ही उमेदवारी जिंकण्याचा विश्वासार्ह पर्याय ठरत आहे.पक्षातील सूत्रांनुसार,“विकास, प्रामाणिकपणा आणि जनतेशी निगडित असलेले घुले कुटुंब हेच भाजपची खरी ताकद”, असे मत पक्षातील वरिष्ठांनी व्यक्त केले आहे.

आता येवता सर्कलमध्ये सर्वांचे लक्ष सौ.प्रगती घुले यांच्या अधिकृत घोषणेवर केंद्रीत झाले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *