आरोग्यसेवा विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल!
अंबाजोगाई/दिलीप कांबळे
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई हे सुमारे ५० वर्षे जुने असून, येथील अनेक इमारती कालबाह्य झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी आणि रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री मा. ना. श्री.अजितदादा पवार साहेबांनी बीड येथे नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत दिल्या.
याच अनुषंगाने आज महाविद्यालय व रुग्णालय येथे प्रत्यक्ष भेट देऊन तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व सर्व विभागप्रमुख यांच्यासोबत बैठक घेतली. सध्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला असून प्रस्तावित कामांकरिता तयार होणाऱ्या मास्टर प्लॅनमध्ये आवश्यक सुधारणा व सूचना यावेळी करण्यात आल्या.
या बैठकीस आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) यांची विशेष उपस्थिती होती. अंबाजोगाईसारख्या वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात नागरिकांना उत्कृष्ट आरोग्यसेवा मिळावी, यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून ही योजना यशस्वीपणे प्रत्यक्षात आणण्याचा माझा निर्धार आहे.

