“हरित बीड अभियान” उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर एकाच दिवशी ३० लाख वृक्षांचे रोपण करण्यात येणार..
अंबाजोगाई/सचिन भालेराव
अंबाजोगाई तालुक्यातील “हरित बीड अभियान” या भव्य वृक्षारोपण उपक्रमाच्या तयारीचा आढावा अंबाजोगाईतील सर्वे क्र. १७ या जागेच्या ठिकाणी, केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. नमिता ताई अक्षय मुंदडा यांनी घेतला.तसेच त्यांनी संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत, ७ ऑगस्ट २०२५ रोजी बीड जिल्ह्यात एका दिवसात ३० लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
पर्यावरण संवर्धन आणि हरितक्रांतीचा संकल्प पुढे नेणाऱ्या या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन आणि सर्व सेवाभावी संस्था, शाळा, महाविद्यालये हे सज्ज झालेले आहेत.
या उपक्रमामुळे केवळ हरित वृक्ष नव्हे, तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाणार आहे.

