शंकर माध्यमिक विद्यालय साळेगाव येथे मौखिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
केज/सचिन भालेराव
केज तालुक्यातील साळेगाव मध्य दि.२ऑगस्ट २०२५ रोजी शंकर माध्यमिक विद्यालय, साळेगाव येथे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मौखिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांच्या दातांची व तोंडाच्या स्वच्छतेचे तपासणी करण्यात आली.
शिबिरात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय राऊत सर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय केंद्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची सखोल तपासणी केली व मौखिक आरोग्याविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले. दातांची निगा कशी राखावी, कोणत्या अन्नपदार्थ टाळावे,याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री. तांबारे सर यांनी डॉक्टरांचे आभार मानले व अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयीची महत्व लक्षात येते असे मत व्यक्त केले. शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.
विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याची जाणीव निर्माण होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरला.

