महाराष्ट्रसामाजिक

उद्या अंबाजोगाईत ताई महोत्सव.


पाच दिवस मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर
अंबाजोगाई/दिलीप कांबळे
केज विधानसभा मतदारसंघाला विकासाच्या प्रवाहात आणून तळ हाताप्रमाणे सांभाळले अशा ताई आणि आई म्हणून ओळखले जाणाऱ्या दिवंगत डॉ. सौ. विमलताई मुंदडा यांच्या जयंती निमित्त ताई महोत्सव अंतर्गत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर उद्या रविवार (दि.१०) सुरु होणार असून गुरुवार (दि. १४) पर्यंत सुरू राहणार आहे.असे पाच दिवस चालणाऱ्या या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ. नमिता मुंदडा यांनी केले आहे. स्व.डॉ. सौ. विमलताई मुंदडा यांच्या जयंती निमित्त वसुंधरा सेवा प्रतिष्ठाण, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकिय रुग्णालय आणि स्व.डॉ. सौ. विमलताई मुंदडा वृध्दत्व व मानसिक आजार केंद्र, लोखंडी सावरगाव ता. अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

सदरील शिबीर दि. १० ते१४ ऑगस्ट असे सलग पाच दिवस सुरू असणार आहे. याची वेळ सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत असून स्वा.रा.ती.ग्रा. शा. वै. रुग्णालय, अंबाजोगाई व स्व.डॉ. सौ. विमलताई मुंदडा वृध्दत्व व मानसिक आजार केंद्र लोखंडी सावरगाव ता. अंबाजोगाई या दोन्ही ठिकाणी शिबीर सुरु राहणार आहे. शिबिराचा लाभ घेणाऱ्या रुग्णांनी येताना आधारकार्ड / राशनकार्ड झेरॉक्स, चालु असलेले औषध गोळ्या व तज्ञ डॉक्टरांचे रिपोर्टस् सोबत आणावेत, या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ. नमिता मुंदडा आणि संयोजकांनी केले आहे. यापूर्वीही ताई महोत्सव अंतर्गत अनेक शिबिरे घेण्यात आलेली आहेत. यामुळे ताई महोत्सव घेण्यात आली असून, हा महोत्सव सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक कार्याचा एक प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *