शेतशिवारात मध्यरात्री चोऱ्यांचा सुळसुळाट; शेतकरी चिंतेत
चंदनसावरगाव शिवारात विद्युत मोटार केबलीच्या चोरीचा धुमाकूळ
केज/सचिन भालेराव
केज तालुक्यातील चंदनसावरगाव शिवारात शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या विद्युत मोटार, वायर व पंप चोरीच्या घटना वाढल्या असून शेतकरी चिंतेत आहेत. चोरटे रात्रीच्या वेळी शेतशिवारात धुमाकूळ घालत असून गेल्या महिन्यात सात ते आठ शेतकऱ्यांच्या शेतातून चोरी झाली आहे.

मध्यरात्री शंकर शिवाजी तपसे यांच्या शेतातील सर्व सोलर प्लेट, तर ८ ऑगस्ट रोजी पुरुषोत्तम तपसे यांच्या दोन पाणबुडी मोटार व वायर, व्यंकटी तपसे यांच्या विहिरीतील मोटार व वायर, गणेश उकंडे यांच्या पाणबुडी मोटार व वायर तसेच अशोक श्रीराम तपसे यांच्या पाणबुडी मोटार आणि बाळासाहेब तपसे यांचे वायर चोरट्यांनी लंपास केले.
शेतकऱ्यांनी या टोळीचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

