निवडणूक आयोगाचा दणका! महाराष्ट्रातील 9 पक्षांची नोंदणी रद्द.
सचिन भालेराव.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत देशभरातील तब्बल 334 राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 9 पक्षांचा समावेश आहे.
६ वर्षांपासून कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत सहभाग नसणे तसेच नोंदणीकृत पत्ता अस्तित्वात नसणे ही मुख्य कारणे देत आयोगाने ही कारवाई केली.
नोंदणी रद्द झालेले महाराष्ट्रातील पक्ष:
१.अवामी विकास पार्टी
२.बहुजन रयत पार्टी
३.भारतीय संग्राम परिषद
४.इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया
५.नवभारत डेमोक्रॅटिक पार्टी
६.नवबहुजन समाजपरिवर्तन पार्टी
७.पीपल्स गार्डियन
८.द लोक पार्टी ऑफ इंडिया
९.युवा शक्ती संघटना
नोंदणी रद्द झाल्यामुळे संबंधित पक्षांना निवडणूक चिन्ह, आयकर सवलत व प्रचाराच्या सुविधा यापुढे मिळणार नाहीत.
तथापि, आयोगाच्या निर्णयाविरोधात ३० दिवसांच्या आत अपील करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या कारवाईनंतर देशात आता फक्त 6 राष्ट्रीय आणि 67 प्रादेशिक पक्ष उरले आहेत.

