संघर्ष माजी सैनिक सेवा संघाच्या कार्यालयाचे पत्रकार चंद्रकांत पाटील व गौतम बचुटे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
केज/सचिन भालेराव
केज शहरातील पंचायत समितीच्या कर्मचारी निवासस्थानी संघर्ष माजी सैनिक सेवा संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन पत्रकार चंद्रकांत पाटील व गौतम बचुटे यांच्या शुभहस्ते दि.15 ऑगष्ट 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघर्ष माजी सैनिक सेवा संघाचे केज तालुकाध्यक्ष मेजर अजिमोद्दीन इनामदार शेख हे होते.सर्वप्रथम फलकाचे फित कापुन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केजचे तालुकाध्यक्ष तथा दैनिक समर्थ राजयोग चे तालुका प्रतिनिधी तथा स्वाभिमानी न्युज चे संपादक चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तसेच कार्यालयाचे उद्घाटन आदर्श पत्रकार संघाचे पदाधिकारी तथा दैनिक पुढारी चे प्रतिनिधी गौतमजी बचुटे यांच्या शुभहस्ते फित कापुन करण्यात आले.यावेळी माजी सैनिक बांधवांनी श्रीफळ वाढवून कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी प्रास्ताविक करताना माजी सैनिक मेजर रामप्रभु राऊत यांनी सांगितले की,पत्रकार आणि सैनिक यांच्या मुळे देशात सौहार्दाचे वातावरण कायम राहिलेले आहे. सैनिकाचा धर्म व जात माणुसकी आहे त्यामुळे भारत देशात शांतता नांदत आहे.सिमेवर डोळ्यात तेल घालून सैनिक सेवा बजावत असतात त्यामुळे सैनिकांप्रती आदरभाव असावा तसेच माजी सैनिकांच्या अडी अडचणी सोडविण्या साठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पत्रकार गौतम बचुटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत माझ्या परिवारामध्ये सैनिक आहेत याचाआपल्याला अभिमान आहे. सैनीकांच्या पाठीशी सदैव आपण राहु अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.पत्रकार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की, संघर्ष माजी सैनिक सेवा संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन आपल्या हस्ते संपन्न झाले हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस असुन स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आमचा सन्मान माजी सैनिकांच्या हस्ते झाला हे आमचे भाग्य आहे तसेच माजी सैनिकांच्या सुखदुःखात आम्ही कायम सोबत आहोत असे त्यांनी सांगितले. पत्रकार नंदुलाल मिसाळ यांनी बोलताना सांगितले की,माझे बंधू सैन्य दलात सेवा बजावत असताना शहीद झाले आहेत. कोल्हेवाडी येथे त्यांचे स्मारक असुन सर्व शासकीय कार्यक्रमाच्या वेळी तेथे सन्मान केला जातो.अध्यक्षीय समारोप करताना मेजर अजिमोद्दीन इनामदार शेख यांनी सांगितले की, माजी सैनिकांच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिली याबद्दल प्रशासनाला धन्यवाद दिले तसेच माजी सैनिकांच्या कामासाठी आपण सदैव कार्यरत आहोत हे सर्व माजी सैनिकांच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे.या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या बद्दल सर्वांचे आभार मानले. यावेळी देशमुख यांच्या भाषणाने वातावरण भावनीक झाले होते. शेवटी राष्ट्रगीताने हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी माजी सैनिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

