कोठी गावात विकासाचा उत्सव, ग्रामपंचायत भवनासह विविध कामांचे लोकार्पण
महंत ह. भ. प. भगवान महाराज, खासदार बजरंग बप्पा सोनवणे, माजी आमदार संगीता ठोंबरे यांची उपस्थिती
केज/सचिन भालेराव
केज तालुक्यातील मौजे कोठी गावात विकासाचा उत्सव रंगला. ग्रामपंचायत भवन, रस्ते, पाणीपुरवठा, वीजप्रकाश व्यवस्था आणि इतर सुविधा अशा विविध कामांचे लोकार्पण रविवारी (दि. 10) मोठ्या जल्लोषात पार पडले.

महंत ह. भ. प. भगवान महाराज वरपगावकर यांच्या हस्ते लोकार्पण झाले. अध्यक्षस्थान रामराजे डोंगरे यांनी भूषविले. उद्घाटक म्हणून बीडचे खासदार मा. बजरंग बप्पा सोनवणे तर प्रमुख पाहुणे माजी आमदार संगीता ठोंबरे उपस्थित होते.
नव्याने उभारलेले ग्रामपंचायत भवन हे गावाच्या प्रगतीचे केंद्रस्थान ठरणार असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उपसरपंच बप्पा डोंगरे यांच्या कार्याची सर्वांनी प्रशंसा केली.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे, बंडू चौधरी, शेकाप नेते भाई मोहन गुंड, माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर चौरे, नगरसेवक भाऊसाहेब गुंड, विलास जोगदंड, ग्रामसेवक गोरे मॅडम, पंचक्रोशीतील सरपंच, पत्रकार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

