महाराष्ट्रसामाजिक

प्रतिष्ठित आय.एल.एस. विधी महाविद्यालय पुणे येथून अँड. अविनाश सोळुंके कायद्याची पदवी घेऊन उत्तीर्ण!


ग्रामीण पार्श्वभूमीतील प्रेरणादायी यशकथा.

केज/सचिन भालेराव

अँड. अविनाश आत्माराम सोळुंके, हे रुईलिंबा (ता. व जिल्हा बीड) येथील रहिवासी, यांनी पुण्यातील नामांकित आय.एल.एस. विधी महाविद्यालय येथून LL.B. ची पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. अत्यंत साध्या आणि ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या अँड.अविनाश यांची ही शैक्षणिक कामगिरी अत्यंत प्रेरणादायी आहे. वडिलांचे लहानपणीच निधन झाल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी आईवर आली, घरातील आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही त्यांनी शिक्षण सोडल नाही. त्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्यातही सक्रीय सहभाग घेतला आणि स्वबळावर आपल्या शिक्षणाची वाटचाल सुरू ठेवली.
आता विधी व्यवसायात पाऊल ठेवताना अँड. अविनाश न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करण्याच्या संकल्पाने पुढे जात आहेत. त्यांचा विश्वास आहे की, कायदा ही केवळ व्यवसायाची वाट नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. दुर्बल, वंचित आणि न्यायासाठी झगडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आधार देण्याचा आणि न्याय मिळवून देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे.
आय.एल.एस. विधी महाविद्यालय, पुणे हे भारतातील एक नामांकित विधी शिक्षणसंस्था असून, येथून सर्वोच्च न्यायालयाचे तीन मुख्य न्यायाधीश आणि महाराष्ट्राचे तीन मुख्यमंत्री यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश यशवंत चंद्रचूड, माझी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण, माझी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख, माझी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माझी उप-मुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे, माजी कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री मोहन धारीया, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील आणि माझी खासदार स्व. राजीव सातव यांसारखे अनेक नामवंत राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील नामवंत व्यक्ती घडले आहेत. अशा महान परंपरेतून विधी शिक्षण घेतलेल्या अँड. अविनाश यांना अभिमान आहे यांनी आता विधी व्यवसायात प्रवेश केला आहे.
अशा गौरवशाली परंपरेतून शिक्षण घेऊन आता अँड. अविनाश सोळुंके यांनी विधी व्यवसायात पाऊल टाकले आहे, हे केवळ रुईलिंबा गावासाठी नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यासाठीही अभिमानास्पद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *