ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडावेत यासाठी निश्चितच प्रयत्न करू-अक्षय भैया मुंदडा.
अंबाजोगाई:
तालुका क्रीडा संकुल, अंबाजोगाई येथे महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन आणि बीड जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६ वी व ५ वी चाईल्ड जिल्हास्तरीय फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२५ चे उद्घाटन पंनगेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन तथा केज विधानसभा मतदारसंघाचे युवानेते अक्षय भैया मुंदडा (भैय्यासाहेब) यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार मिळालेल्या सर्व खेळाडूंचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या.
आपल्या या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडावेत यासाठी निश्चितच प्रयत्न करू असे मनोगत व्यक्त केले.

