सामाजिक

सोनिजवळा येथील गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी सरपंच पुढे, स्वःता च्या शेतीला पाणी न देता शेतीतुन गावांमध्ये केला पाणीपुरवठा.


केज ता. प्रतिनिधी

केज तालुक्यातील सोनिजवळायेथील सरपंच गोविंद ससाणे यांनी एप्रिल महिन्या पासून आज पर्यंत स्वःताच्या शेतीला पाणी न देता गावासाठी शेतातुन पाणी आणले, भर उन्हाळ्यात गावाला पाणी नाही. बारा गावासाठी पाणी पुरवठा करणारी धनेगावची पाईपलाईन जीर्ण झाली असल्याने गावातील लोकांचे होत असलेले हाल पाहावले नाही आणि शेतीमध्ये कुठलेही पिक न घेता गावासाठी पाणी उपलब्ध करुन दिले, विहीरीने गाठलेला तळ, आटलेले हातपंप त्यामुळे निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई गावकऱ्यांचे पाण्यासाठी होत असलेले हाल बघुन सरपंचांनी पुढाकार घेतला आणि आपल्या शेतातील पिक वाळवुन शेतातील पिकांचे नुकसान करुन शेतातील २ विहिरीचे व २ बोरचे पाणी गावकऱ्यांना उपलब्ध करुन दिले यामुळे पंच क्रोशीतील नागरिकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

सरपंच गोविंद ससाणे यांना मानवतेची, माणुसकीची आणि आपुलकीची जाणीव असल्याने विहीर अधिग्रहण न करता किंवा पाण्याचा कोणताही मोबदला आपल्याला नको,गावकऱ्याना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करु देणार नाही,अशी भुमिका त्यांनी घेतली.विहीरी सोबतच स्वःताचा मोटार पंप पाइपलाइन आणि विज उपलब्ध करुन दिली आहे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा योग्य रीत्या होण्यासाठी त्यांनी हनुमान मंदीर परिसरात व म्हसोबा देवस्थान परिसरात दोन ठीकानी पाणी उपलब्ध करून दिले. गावच्या पाण्याचा प्रश्न पाहुन आपण विना मोबदला पाणी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *