ब्रेकिंग न्यूजसामाजिक

केजच्या नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांना डॉक्टरेट पदवी प्रदान


केज/सचिन भालेराव

केजच्या नगराध्यक्षा सौ. सीताताई प्रदीप बनसोड यांना युनिव्हर्सिटी ऑफ टोलोसा, मेक्सिको मार्फत मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.

सौ. सीताताई बनसोड या गेली २५ वर्षे समाजकार्यात झोकून देऊन काम करत आहेत. वयाच्या २५व्या वर्षापासून त्यांनी सामाजिक चळवळीत प्रवेश केला. बजरंग नगर, केज येथील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी हाती घेतले. त्यानंतर महिला बचत गटांमार्फत महिलांना स्वयंरोजगार व आत्मनिर्भर बनविण्याचे कार्य त्यांनी केले.

शेतकरी, शेतमजूर, महिला व बालकांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. बालकल्याण समितीच्या माध्यमातून संपूर्ण बीड जिल्ह्यात कार्य करून त्यांनी आपला ठसा उमटवला. मानवी हक्क अभियानामध्ये काम करताना त्यांनी दलित, महिला आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

याशिवाय, त्या रोटरी क्लब ऑफ केजच्या पहिल्या महिला अध्यक्षा राहिल्या असून, सध्या केज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी केलेल्या योगदानामुळेच युनिव्हर्सिटी ऑफ टोलोसा, मेक्सिको यांनी त्यांना या पदवीसाठी सन्मानित केले.

या मानद डॉक्टरेटमुळे त्या आता डॉ. सीताताई बनसोड म्हणून ओळखल्या जातील. सामान्य कार्यकर्त्याच्या कार्याला मिळालेला हा सन्मान असल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आनंद व अभिमान व्यक्त होत आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *