श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलचे यश पुन्हा एकदा उजळले; श्रीशैल्य लोकरे यांची नवोदय विद्यालयात निवड.
विद्यार्थी चि. श्रीशैल्य लोकरे यांची नवोदय विद्यालय, गडी येथे निवड; शाळेत सत्कार सोहळा
केज/सचिन भालेराव
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या इयत्ता सहावी प्रवेशपूर्व परीक्षेच्या निकालाची तृतीय यादी 20 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर झाली. या परीक्षेत श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल, किल्ले धारूर येथील विद्यार्थी चिरंजीव श्रीशैल्य चांगदेव लोकरे याची निवड नवोदय विद्यालय, गडी येथे झाली आहे.

दिनांक 23 ऑगस्ट रोजी शाळेच्या वतीने श्रीशैल्य लोकरे यांचा पालकांसह सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. बाळासाहेब राठोड सर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिसरातील मान्यवर व शिक्षणप्रेमी उपस्थित होते. सर्वांनीच या यशाबद्दल कौतुक व्यक्त केले.
या यशाबद्दल बोलताना चि. श्रीशैल्य लोकरे व त्यांच्या पालकांनी सांगितले की, “आमच्या या यशामागे श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन आणि सहकार्य हेच प्रमुख कारण आहे. भविष्यातही शाळेचे विद्यार्थी असेच यश संपादन करतील, अशी आम्ही अपेक्षा बाळगतो.”
शाळेच्या वतीने चि. श्रीशैल्य लोकरे यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

