डॉ. दत्ता तपसे यांच्या वाढदिवसानिमित्त यु. वडगावात महाआरोग्य शिबिर संपन्न
केज/सचिन भालेराव
बीड जिल्ह्यातील केज तालूक्यामध्य यु. वडगांव येथे राजमुद्रा मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष व कार्ला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता तपसे यांचा वाढदिवस दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात महा आरोग्य शिबिर, गुणवंतांचा सत्कार, शालेय साहित्य वाटप व आरोग्य तपासणी शिबिर यांचा समावेश होता.
आरोग्य शिबिरात रक्तदान व रक्ततपासणी, हाडांचे आजार, स्त्रीरोग, दंतरोग, कर्करोग व नेत्ररोग तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात आल्या.
तसेच सेवानिवृत्त स्वातंत्र्यसैनिक, शासकीय कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांचा सत्कार समारंभही संपन्न झाला.

या सर्व कार्यक्रमांचे आयोजन राजमुद्रा मेडिकल फौंडेशन, वृक्षवली सेवाभावी संस्था, उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय व लाईफ सक्सेस फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून उपक्रमाला प्रतिसाद दिला. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. दत्ता तपसे यांनी मानले.

