मंगळवारचा आठवडी बाजार फलोउत्पादनाच्या जागेत स्थलांतरित करण्यात यावा – चंद्रकांत खरात सर
केज ता.प्रतिनिधी
केज येथील मंगळवारचा आठवडी बाजार हा फलोत्पादनाच्या जागेत स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे मराठवाडा संघटक चंद्रकांत खरात सर यांनी तहसीलदार केज यांच्याकडे केली आहे. जर प्रशासनाने निवेदनाची तात्काळ दखल न घेतल्यास भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा प्रशासनास इशारा दिला आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, केज शहराची व्याप्ती वाढली असून सध्या मंगळवारच्या आठवडी बाजार भरत असलेले ठिकाण व त्या ठिकाणची जागा ही बाजार भरण्यासाठी अपुरी पडत आहे. सदर बाजार हा मेन रोडवर भरवण्यात येत आहे, परंतु केज शहराची व तालुक्याची व्याप्ती पाहता सदर बाजाराची जागा शहराच्या दृष्टिकोनाने अपुऱ्या स्वरूपाचे आहे त्यामुळे अनेक वेळा अपघातासारख्या दुर्दैवी घटना शहरांमध्ये घडलेल्या आहेत यापुढेही दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याकरिता तहसीलदार केज यांनी स्वतः लक्ष घालून तात्काळ सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केज नगरपंचायत ला आदेशित करून फलोउत्पादनाच्या (जिरायत खात्याच्या) जागेवर मंगळवारचा आठवडी बाजार भरवण्यात यावा.
पाठीमागील १५ ते २० दिवसांपूर्वी मंगळवारच्या दिवशीच आठ दिवसाच्या फरकाने दोन वेळा दोन मोठे अपघात होऊन त्या दोन्हीही अपघातामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर सदर अपघातामध्ये २५ ते ३० नागरिक गंभीर स्वरूपाचे जखमी झाले होते. सध्या मंगळवारच्या आठवडी बाजारामुळे नागरिकांच्या जीवितस धोका निर्माण झाला आहे तसेच नागरिकांच्या जीविताचा धोका थांबवण्यासाठी शासनाच्या फलोत्पादनाच्या जागे त आठवडी बाजार भरवणे हे योग्य ठरेल व केजच्या रहदारीस व वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही असे लेखी निवेदनात चंद्रकांत खरात सर यांनी म्हटले आहे पुढे निवेदनात खरा सर यांनी म्हटले की, चेस तहसीलदार यांनी मंगळवारच्या आठवडी बाजार प्रकरणी स्वतः लक्ष देऊन तात्काळ सदर बाजार हा फलोउत्पादनाच्या जागे स्थलांतरित करण्यात यावा अन्यथा अन्यथा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा प्रशासनास इशारा दिला आहे. सदर मागणीचे लेखी निवेदन केज तहसीलचे पेशकर ननवरे यांनी स्वीकारले आहे. लेखी निवेदनाच्या प्रति तहसीलदार केज, जिल्हाधिकारी बीड, नगराध्यक्ष नगरपंचायत केज, मुख्याधिकारी नगरपंचायत केज यांना दिले आहेत.

