महाराष्ट्रात दोन ठिकाणी महापुरुषांची विठंबनेस कारणीभूत समाजकंठकास कठोर शिक्षा करा– पुरोगामी पत्रकार संघ.
केज | प्रतिनिधी
महाराष्ट्रात नुकत्याच पनवेल आणि चाकूर (जि.लातूर) या दोन ठिकाणी महापुरुषांची विटंबना झालेल्या घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही घटनेतील आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ शाखा केजच्या वतीने केज तहसिलदार यांच्याकडे दि.२४ जुन रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
पनवेल शहरात असलेला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णकृती पुतळ्याचे एका समाजकंटकाने विटंबना करण्याचा प्रयत्न केला व चाकूर (जि.लातुर) येथे भूमि अभिलेख कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या त्या समाजकंटकावर प्रशासनाने कठोरात कठोर शिक्षा करावी व या समाजकंटकाच्या मागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेऊन त्यास कठोर शासन करण्याची मागणी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ केज शाखेच्या वतीने केज तहसिलदार कार्यालयात निवेदणाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी संघाचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष अनिल वैरागे, संघाचे केज तालुका अध्यक्ष दिनकर जाधव, ता.सचिव मनोराम पवार, मा.तालुकाध्यक्ष रंजित घाडगे, सचिन भालेराव, सचिन लांडगे, कल्याण मस्के यांच्यासह पत्रकार तात्या गवळी यांची उपस्थिती होती.

