केज येथे नवनिर्वाचित पत्रकार पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न
केज/सचिन भालेराव
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा- केज यांच्या वतीने नवनिर्वाचित पत्रकार पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ शासकीय विश्रामगृह, केज येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात प्रकाशपर्व न्यूज पोर्टल बीड जिल्हा संपादक पदी लिंबराज शंकरराव गायकवाड, दैनिक वादळ वार्ता बीड जिल्हाध्यक्ष पदी कपिल अंबादास मस्के आणि पुरोगामी पत्रकार संघ बीड जिल्हाध्यक्ष पदी रणजित तात्याराम घाडगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास केज तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केजचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे होते. त्यांच्यासोबत तालुका उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड, पांडुरंग कसबे, नंदू मिसाळ, पुरोगामी पत्रकार संघ केज तालुकाध्यक्ष दिनकर जाधव, सक्रिय पत्रकार संघ केज तालुकाध्यक्ष संतोष गालफाडे, सह्याद्री पत्रकार संघ केज तालुकाध्यक्ष अनिल ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात पत्रकार धनंजय कुलकर्णी ,मुबशीर खतीब,सचिन भालेराव, महादेव काळे, दीपक नाईकवाडे,दत्तात्रय मुजमुले, बाळासाहेब जाधव, सुहास चिद्रवार, अनिल वैरागे, संभाजी ब्रिगेडचे राहुल खोडसे, पत्रकार मनोराम पवार, दिलीप खाडे, सचिन लांडगे, मुनीर कुरेशी, कल्याण मस्के, बलभीम मस्के, लक्ष्मण ओव्हाळ, भगवंत वायबसे, दत्ता गायकवाड सर, सरपंच शशिकांत इंगळे लक्ष्मण ओव्हाळ, भगवंत वायबसे,अश्रुबा खरात यांची उपस्थिती लक्षणीय होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक वादळ वार्ताचे संपादक अजय भांगे यांनी केले. प्रास्ताविक पांडुरंग कसबे यांनी तर आभार प्रदर्शन चंद्रकांत पाटील यांनी केले. सत्कारमूर्ती कपिल मस्के, रणजित घाडगे आणि लिंबराज गायकवाड यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
सत्कारप्रसंगी शाल, पुष्पगुच्छ, मानचिन्ह व पेन देऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांचे योगदान व उपस्थितीमुळे समारंभ यशस्वीरीत्या पार पडला.

