सोनेसांगवीकरांचा अभिमान–मेजर बाबाराजे सर्जेराव दहिभाते !
मेजर बाबाराजे सर्जेराव दहिभाते सोनेसांगवीकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त जाहिर नागरी सत्कार
केज/सचिन भालेराव
बीड जिल्हातील केज तालूक्यामधील मौजे सोनेसांगवी करांचा अभिमान असलेल्या मेजर बाबाराजे सर्जेराव दहिभाते यांनी भारतीय सैन्यातील २० वर्षांची यशस्वी सेवा पूर्ण करून, दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी गौरवाने सेवानिवृत्ती स्वीकारली आहे.
या विशेष प्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली आणि एक भव्य असा जाहिर नागरी सत्कार आयोजीत करण्यात आला. देशसेवेत दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल संपूर्ण सोनेसांगवी कर त्यांचा मनःपूर्वक गौरव करत आहे.
आपल्या मातृभूमीची निष्ठेने सेवा केली आणि त्यांच्या या कार्यकाळात प्रामाणिकपणा, निष्ठा, शौर्य, शिस्त, कर्तव्यपरायणता आणि जबाबदारीची जाण सदैव दिसून आली.
या गौरवशाली २० वर्षांच्या प्रवासानंतर, संपूर्ण सोनेसांगवीकराणी त्यांचा भव्य सत्कार केला. तसेच, हा केवळ एक कार्यक्रम नसून त्यांनी केलेल्या अमूल्य योगदाना बद्दल कृतज्ञतेची भावना सर्व गावाकऱ्यांनी व्यक्त केली.

