साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती धनेगाव येथे उत्साहात साजरी

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती धनेगाव येथे उत्साहात साजरी
केज/सचिन भालेराव
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त धनेगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समाधान आठवे यांनी भूषविले. तर जयंती कार्यक्रमाचे नियोजन उपाध्यक्ष सौरव सोनवणे यांनी केले. या वेळी राणा सोनवणे, दीपक सोनवणे, उपसरपंच किशोर सोनवणे, सनी शिंदे, रोहन सोनवणे, गणेश सोनवणे, बाळू रसाळ, हर्षद सोनवणे, मयूर कसबे, आदित्य सोनवणे, तुळशीराम वैराग, गौरव सोनवणे, यश सोनवणे, अक्षय सोनवणे, रोहित सोनवणे, अजय सोनवणे, अविनाश आठवे, ओमराज लोंढे, ओमकार सोनवणे, दया सोनवणे, दादा सोनवणे, विजयकुमार सोनवणे, तानाजी लोंढे, नागेश सोनवणे, विकास सोनवणे, तानाजी सोनवणे, मयूर सोनवणे, डी.के. सोनवणे, राजु सोनवणे तसेच समस्त साठे नगर धनेगाव उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी समाजातील वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांना दिशा मिळाली. त्यांच्या लेखणी व क्रांतिकारी कार्यामुळे सामाजिक न्यायाचा दीप पाजळला. यावेळी वक्त्यांनी त्यांच्या जीवनप्रवासाचे स्मरण करून आदर्श व्यक्तिमत्वातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मान्यवरांनी परिश्रम घेतले. शेवटी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

