सामाजिक

पाईपलाईन खोदकामामुळे रस्ता खराब; नुकसानभरपाई व दोषींवर कारवाईची मागणी


पाईपलाईन खोदकामामुळे रस्ता खराब; नुकसानभरपाई व दोषींवर कारवाईची मागणी


अंबाजोगाई/दिलीप कांबळे

अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव ते सनगाव (ग्रामीण रस्ता क्र. 119) या रस्त्यावर पाईपलाईन रस्त्याच्या बाजूने नेण्याऐवजी रस्त्याच्या मधोमध टाकण्यात आली. जेसीबीद्वारे खोदकाम करताना रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला असून, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अधिक अभियंता बी. एम. शिंदे, शाखा अभियंता एस. बी. तांदळे आणि गुत्तेदार होळंबे यांच्यावर गुन्हा दाखल करून, नुकसान झालेली रक्कम वसूल करण्यासोबतच संबंधित एजन्सी ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट)चे जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड यांनी केली आहे.

गेल्या वर्षी रास्ता रोको आंदोलन करूनही रस्ता दुरुस्त न झाल्याने आता गायकवाड यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. पावसाळा सुरू असल्यामुळे शाळकरी मुलांना ये-जा करताना अडचणी येत असून, शेतकऱ्यांच्या मालवाहतुकीवरही परिणाम होत आहे. शासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *