महाराष्ट्रसामाजिक

“एक पेड माँ के नाम 2.0” अभियानांतर्गत कानडी माळी येथे 1000 वृक्षांची यशस्वी लागवड.


केज/सचिन भालेराव

कानडी माळी (ता. केज, जि. बीड) – पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, “एक पेड माँ के नाम 2.0” या राज्यव्यापी अभियानाअंतर्गत कानडी माळी येथे भव्य वृक्षलागवड मोहीम यशस्वीरित्या पार पडली. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार 7 जुलै रोजी बीड जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, त्याचाच एक भाग म्हणून या गावात सुमारे 1000 वृक्षांची लागवड करण्यात आली.

या मोहिमेत ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, यांच्या सहभागाने उत्साहात सहभाग नोंदवला गेला. आंबा, सागवान, चिंच, कडुलिंब, बाभळी यांसारख्या देशी व पर्यावरणपूरक वृक्षप्रजातींची निवड करून त्यांच्या लागवडीस प्राधान्य देण्यात आले.

ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. अशोक राऊत म्हणाले, “पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज आहे. वृक्षलागवड ही केवळ एक सामाजिक जबाबदारी नसून भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे.”

या उपक्रमात उपसरपंच बाळासाहेब राऊत, ग्रामपंचायत सदस्य मसुराम राऊत, राहुल राऊत, रामेश्वर राऊत, बाळासाहेब खाडे, मुख्याध्यापक, तलाठी, मंडळ अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते दत्तू राऊत, हनुमंत राऊत, जया राऊत यांच्यासह अनेक मान्यवरांनी सक्रिय सहभाग घेतला.

लागवडीनंतर वृक्षांचे संगोपन व देखभाल यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली असून, हा उपक्रम दीर्घकालीन परिणाम साधणारा ठरणार आहे. गावकऱ्यांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्तपणे स्वागत करत, भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

हरित महाराष्ट्राच्या दिशेने कानडी माळीचे टाकलेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी ठरेल. 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *