कुंबेफळ येथे विठ्ठल बिरुदेव भंडारा व परज कार्यक्रम संपन्न.
ढोल-झांज व ओव्यांच्या स्वरात कुंबेफळात भंडारा उत्सव
केज/सचिन भालेराव
केज तालुक्यातील कुंबेफळ येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रविवार रोजी श्री विठ्ठल बिरुदेवाच्या भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक पद्धतीनुसार धनगरी ओवीगायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

ढोल, झांज, अब्दागिरी, छत्री आणि निशाण पताका घेऊन सलग पाऊल खेळत भंडाऱ्याची उधळण करत परज मिरवणूक निघाली. बिरुदेव वीर देवांचा हेडाम पार पडल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी परिसरातील मोठ्या प्रमाणात वीरकरी व नागरिक उपस्थित होते. गावातील ग्रामस्थांसह सर्वच क्षेत्रातील मंडळींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

