बीडचा दिल्लीत डंका; खा.सोनवणेंच्या आक्रमक पावित्र्यामुळे सभागृह तहकूब
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर चर्चा करण्याची केली मागणी
केज/सचिन भालेराव
सोमवारी मतचोरीच्या विषयावरून इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी बीडचे खा.बजरंग सोनवणे आघाडीवर दिसले. दरम्यान, मंगळवारी सभागृहात याच विषयावर खा. बजरंग सोनवणे यांनी जोरदार आवाज उठवला. या विषयावर संसदेत आवाज उठवणारे खा.सोनवणे हे पहिले सदस्य ठरले. त्यांच्या समर्थनार्थ इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांनी घोषणाबाजी करत गदारोळ केला. अखेर, गोंधळ वाढल्याने लोकसभा अध्यक्षांना कामकाज बंद करून सभा तहकूब करावी लागली.


