शिक्षणसामाजिक

विद्यार्थ्याचा विकास हाच आमचा ध्यास :- श्रीमती बावचकर


विद्यार्थ्याचा विकास हाच आमचा ध्यास :- श्रीमती बावचकर

भालगाव येथील शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

केज/सचिन भालेराव

शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांचा भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या स्पर्धा परीक्षेतील एम टी एस या स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ भालगाव -१ येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

व्यासपिठावर ग्रामसेवक पुजारी, प्रशासक चौरे,युवराज ढोबळे, बालासाहेब मोरे,अमीन पठाण , मयूर सुरवसे, गिरी भगवान, उत्तमराव सुरवसे मेजर, राजेभाऊ मोरे मेजर,अरविंद मोरे उपस्थित होते.जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो म्हणून विद्यार्थ्याचा विकास हाच आमचा ध्यास असल्याचे शाळेच्या शिक्षिका श्रीमती बावचकर बोलताना सांगितले. भालगाव.१ येथील जिल्हा परिषद शाळेतून एम टी एस.या शासनाच्या मान्यता प्राप्त स्पर्धा परीक्षेत आरोही गोविंद कांबळे व कृष्णिका शरण मिटकरी यांनी गोल्ड मेडल, सिद्धी खंडू विभुते,सृष्टी बापूसाहेब मोरे, सृष्टी रमेश पारडे,यांनी सिल्वर मेडल पटकावले तर सिद्धेश्वर खंडू विभुते ,अमृता किशोर जाधव

संजीवनी चंद्रकांत कांबळे ,समृद्धी दत्ता कांबळे हे विद्यार्थी पास झाले आहेत.त्याचबरोबर उर्दू शाळेचे मुख्याध्यापक खतीब तसेच श्रीमती बावचकर मॅडम यांचाही चांगल्या कार्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अजय काळे, उर्दुचे मुख्याध्यापक  खतीब, शिक्षिका बावचकर, श्रीमती.दहिभाते, फरहत बाजी यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *