युसुफवडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता बैठक पार पडली
युसुफवडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता बैठक पार पडली
केज/सचिन भालेराव
केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत आज शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीला पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. शेंडगे साहेब उपस्थित होते.

गणेशोत्सव व ईद या आगामी सार्वजनिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शेंडगे साहेबांनी नागरिकांना कायद्याचे पालन करण्याचे, धार्मिक वाद टाळण्याचे तसेच गावामध्ये शांतता व सौहार्द टिकविण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांनी अमली पदार्थ विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली आणि गावागावात होणाऱ्या वादांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस प्रशासन सदैव तत्पर असल्याचे सांगितले. उपस्थितांना त्यांनी अतिशय मार्मिक व प्रभावी भाषेत मार्गदर्शन केले.

