सातेफळमध्ये अतिवृष्टीचा तडाखा; शेतकऱ्यांना मदतीची गरज.
अतिवृष्टीमुळे सातेफळ गावात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेले असून या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी गावचे सरपंच कृष्णा थोरात, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विधानसभा अध्यक्ष दादासाहेब ससाने, चिंचोली माळी सर्कलचे प्रतिष्ठित नागरिक मालोजी नाना गलांडे यांनी केली.

या पाहणीसाठी सातेफळ गावातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला गेला. यावेळी सरपंच कृष्णा थोरात यांनी नागरिकांना आवाहन केले की, “सर्वांनी एकत्र येऊन आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवला तरच झालेल्या नुकसानीची भरपाई मिळू शकेल.”
दीपक घाडगे यांच्या शेतात नुकसानीची पाहणी करताना गावचे मान्यवर, ज्ञानेश्वर भांगे, विनोद भांगे, अनंत भांगे तसेच घाडगे वस्तीवरील शेतकरीही उपस्थित होते.

