ऑल इंडिया पँथर संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान बचूटे युसूफवडगाव पंचायत समिती गणातून निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत
केज/सचिन भालेराव
येत्या पंचायत समिती निवडणुकीत ऑल इंडिया पँथर संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान बचूटे युसूफवडगाव गणातून निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. सामाजिक कार्यात सातत्य, जनसंपर्क आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढा यामुळे ते परिसरात लोकप्रिय झाले आहेत.
समाधान बचूटे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून युवक, शेतकरी आणि वंचित घटकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांची नम्रता, प्रामाणिकपणा आणि लोकसंपर्क हीच त्यांची ताकद ठरत असून, त्यांच्या उमेदवारीची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.
युसूफवडगाव परिसरात बचूटे यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत ते मजबूत दावेदार ठरतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

