जि.प.प्रा.शाळा शे. गांजी येथे ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती उत्साहात साजरी
जि.प.प्रा.शाळा शे. गांजी येथे ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती उत्साहात साजरी
केज/सचिन भालेराव
जि.प.प्रा.शाळा शे. गांजी येथे भारताचे माजी राष्ट्रपती व महान वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमास मुख्याध्यापक तांबारे सर, पवार मॅडम, समाधान बचूटे, अमोल जाधव तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम यांच्या कार्यावर भाषणं, कविता आणि विचार सादर करून त्यांना अभिवादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षकांनी केले, तर शेवटी सर्व उपस्थितांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

